तीन विषयात नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन
विद्यार्थ्याच्या मनावर अभ्यासाचा,कुटुंबीयांचा किती ताण आहे? आणि हा ताण घेणे विद्यार्थ्यांना किती नैराश्य येत आहे. या गोष्टीचा विचार करणे आता खूप महत्वाचे आहे. नाशिकमध्ये नुकतीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अठरा वर्षांच्या विद्यार्थिनीने तीन विषयात नापास झाल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

नाशिकमधील सिडकोतील कालिका पार्क परिसरात राहणाऱ्या मयुरीने मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,” मयुरी सोनवणे नाशिकमधील मराठा मराठा महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षाला शिकत होती. या वर्षी ती तीन विषयात नापास झाल्याने नैराश्येत गेली होती. बरोबरीच्या मैत्रिणी पुढील वर्गात गेल्याने तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेची नाशिकमधील अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात केली आहे. पुढील तपास अंबड पोलिस करीत आहेत.