धक्कादायक….मानवत येथील तहसीलदाराच्या दालनातच चार गावकर्‍यांनी केले विषप्राशन

मानवतः पोलीसनामा आॅनलाईन
मानवत येथील तहसिलदाराच्या कार्यालयातच चार गावकऱ्यांनी विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (19 तारखेला) सकाळी पाऊणे अकराच्या सुमारास घडली. लक्ष्मण शिंदे ,चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम ,शेख शगिर अशी विषप्राशन केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. चौघांच्या उपचारासाठी मानवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, चंद्रकांत तळेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

गावातील गैरव्यावहाराची चाैकशी करावी, गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच गावात बांधण्यात आलेल्या 22 बोगस बंधाऱ्यांची चाैकशी करावी. अशा विविध मागण्याचे निवेदन तालुक्यातील मानोलीच्या 15 गावकऱ्यांनी 10 एप्रिल रोजी निवेदन तहसिलदाराना दिले होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनातील समस्या न सोडविल्यास 19 एप्रिलला सामूहिक आत्महत्येचा इशारा देखिल दिला होता. त्यानुसार आज सकाळी गावकरी तहसील कार्यालयात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी लक्ष्मण शिंदे ,चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम ,शेख शगिर यांनी विषप्राशन केले.