नारायणगाव येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाईन

वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या नऊ पिडित मुलींची सुटका करुन हॉटेल मालक, व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कांदळी येथील हॉटेल योगीराज लॉजवर करण्यात आली. हॉटेल योगीराज लॉजमध्ये वेश्या व्यवसायासाठी मुली व महिला आणण्यात आल्या असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी योगिराज लॉजवर छापा टाकून या ठिकाणी असलेल्या नऊ मुलींची सुटका केली. या मुली मुंबई, पुणे आणि कोलकत्ता येथून वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आल्या होत्या. याप्रकरणी लॉज चालक कृष्णा सुरेश फरपट (वय ३० रा.नारायणगाव, मुळ रा. खामखेड जि.बुलढाणा),लॉज व्यवस्थापक अजय रुपलाल राजने (रा.कांदळी,रा.पतराडे अमरावती)आणि लॉज मालक शेषमल हारकू लांडगे (रा. वडगाव कांदळी ता.जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भिमा यशवंत लोंढे पोलीस हवालदार यांनी आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा परिसरात वेश्या व्यवसायासाठी काही महिला आणि मुलींना आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मुलींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामिण पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके व सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड या पथकाने आळेफाटा व परिसरातील सर्व लॉजची तपासणी केली. तपासणी दरम्यान त्यांना कांदळी गावाच्या हद्दीतील योगीराज हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी मुली आणि महिला आणण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता त्यांना नऊ पिडिती मुली आढळून आल्या.

पोलिसांनी लॉज चालक आणि व्यवस्थापक यांना अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली. आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची( दि ७ पर्यंत) पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.