नेपाळमध्ये भारतीय दुतावासाजवळ स्फोट; ‘आयएसआय’वर कटाचा संशय

काठमांडू : वृत्तसंस्था
नेपाळमधील भारतीय दुतावासाजवळ एक शक्तिशाली स्फोट झाल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. या स्फोटात कोणतीही जीवित हानी झाली नसून भारतीय दुतावासाच्या इमारतीची भिंत मात्र कोसळली. हा स्फोट नेपाळमधील बिराटनगरयेथील भारतीय दूतावासात सोमवारी रात्री झाला. मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञान तरुणांनी येथे बॉम्ब लावल्याचे समजते. या प्रकरणाची पुढील चौकशी नेपाळ पोलीस करीत आहेत.

स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चा हात असण्याची शक्यता आहे. कारण आयएसआयने अशा प्रकारे इतर देशातील भारतीय दुतावासांना लक्ष्य करून कट केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नेपाळमधील वृत्तपत्र दैनिक नेपाळच्या माहितीनुसार,पोलीस प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले की,”या स्फोटामुळे भारतीय दुतावासाची पश्चिम भिंतीचे मोठे नुकसान झाले आहे. नेपाळमध्ये नुकतेच कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आले आहे.

याचा परिणाम नेपाळचे नेतृत्व के. पी. शर्मा ओली यांच्याकडे आहे. या शर्मा यांचा कल चीनकडे जास्त आहे. यामुळे नेपाळमध्ये भारत विरोध वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेपाळमधील भारतीय दुतावासाबाहेर झालेल्या स्फोटामुळे हा संशय खरा ठरण्याची चिन्हे आहेत.