नैराश्येतून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

फायनान्स कंपनीतील नोकरी गेल्याने माळशीरस (जि. सोलापूर) येथील तरुणाने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील राजेंद्रनगर येथे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.

अविनाश गोपाळ वाघमोडे (वय २४, रा़ माळशिरस) असे या तरुणाचे नाव आहे. अविनाश वाघमोडे याने राजेंद्रनगर येथील पीएमसी बिल्डिंगमधील मित्राच्या रुमवर गळफास घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश वाघमोडे हे माळशिरस येथे एका फायनान्समध्ये काम करीत होते. फायनान्स कंपनीतील नोकरी गेल्याने नोकरीच्या शोधात पुण्यात आले होते. पुण्यातील राजेंद्रनगर येथे त्यांचा मित्र राहत असून ते त्याच्याकडे राहत होते. मित्राच्या गावचा उरुस असल्याने मित्र गावी गेला होता. सोमवारी दिवसभर दारवाजा उघडला नसल्याचे शेजा-यांच्या लक्षात आले. शेजा-यांनी दरवाजा ठोठावला परंतू आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे याची माहिती विश्रामबाग पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा उघडून खोलीत प्रेवेश केला. त्यावेळी त्यांना अविनाशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्या सामानाची झडती घतेली असता त्या ठिकाणी विषाची बाटली आढळून आली. यावरुन त्याने आगोदर विष पिले आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.