पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दाैऱ्यावर आहेत. आज दुपारी ते मुंबईत दाखल झाले. यानंतर त्यांनी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन केले. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून शिवसेना- भाजप यांच्यात चांगलाच कलगी तुरा रंगला आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टानुसार स्थानिक खासदार-आमदार व लोकप्रतिनिधींची नावे टाकली जाणे गरजेचं होतं मात्र, शिवसेनेला या कामाचे श्रेय जाऊ नये म्हणून भाजपाने त्यांची नावे कार्यक्रम पत्रिकेवर टाकली नाहीत. किंवा साधे निमंत्रण देखील दिले नाही. या हेटेखोर वागणूकीमुळे शिवसेना चांगलीच संतापली असून, त्यांनी आजच्या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालून शिवसैनिकांनी मोदींना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.

नवी मुंबई येथील उलवा येथे होणा-या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन दुपारी चारच्या सुमारास पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र, भाजपने शिवसेनेला या कार्यक्रमापासून दुर ठेवत स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे निमंत्रण पत्रिकेवरून गायब केली होती. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमास कोणीही हजर नव्हते. या भागातील खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे आहेत. नवी मुंबईत परिसरातील खासदार व राजन विचारे व स्थानिक आमदार मनोहर भोईर यांचेही नाव जाणीवपूर्वक छापलेले नव्हते. त्यामुळे शिवसेना भडकली होती. कार्यक्रमावर बहिष्कार घालतानाच पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केल्याचे शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.