पार्किंग धोरणा विरोधात भाजप वगळता सर्व राजकीय पक्षाचा महापालिकेवर मोर्चा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पुणे महानगरपालिकेतील सताधारी भाजप ने स्थायी समितीच्या बैठकीत पार्किंग धोरण मंजूर केल्याच्या निषेधार्थ आज महापालिकेवर भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी आंदोलन केले.त्यामुळे महापालिकेसमोर वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाले.याचा फटका सर्व सामन्याला बसला.या आंदोलनांमुळे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने महापौर मुक्ता टिळक बाहेर थाबांवे लागल्याने या आंदोलानाचा फटका महापौरांना देखील बसला.

पुणे महानगरपालिकेत मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पार्किंग पॉलिस ला मंजुरी दिल्याने आज पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर  पतित पावन संघटनेने प्रवेशद्वारावर बैलगाडी आणली,संभाजी ब्रिगेड ने भिक मांगो आंदोलन केले.तर आतील बाजूस काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पायऱ्यावर बसून निषेध व्यक्त केला.या सर्व राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेता.महापालिका प्रशासनाने मुख्य इमारतीची चार ही गेट बंद केली होती.त्यामुळे आतून कोणाला बाहेर पडता येत नव्हते.तर बाहेरून कोणाला आत जाता येत नव्हते.त्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

त्यात आज महापालिकेत सर्व साधारण सभा असल्याने या सभेत पार्किंग पॉलीसी चा विषय मंजुरीसाठी येणार असल्याने सर्व पक्षीय नगरसेवक प्रवेशद्वारा अडकून पडले.त्यामुळे काही नगरसेवकांनी महापालिकेच्या भितीवरून जाणे पसंत केले.आत गेल्यावर आतील प्रवेशद्र देखील बंद असल्याने अनेक नगरसेवकांना थांबावे लागले.तेवढ्यात महापौर मुक्ता टिळक आल्या.त्या आल्या तरीही त्यांना काही काळ वेळ पाहावी लागल्याने महापौरांना देखील आंदोलनाचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर सर्व साधारण सभा सुरु झाल्यावर शिवसेने पार्किंग धोरणा विरोधात काळे कपडे घालून आंदोलन करीत निषेध व्यक्त केला.हे सर्व आंदोलन पाहता भाजप च्या विरोधात सर्व संघटना एकवटल्याचे पाहाव्यास मिळाले असून आता पार्किंग धोरण मंजूर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.