पिंपरीतील चिक्की कारखान्यात गॅस सिलेंडरचा स्फोट

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी मधील चिक्की कारखान्यात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली असून त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहे. महाराष्ट्र कॉलनीत चिक्की बनवण्याच्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे.

अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी येथे असलेल्या चिक्की कारखान्यात एक वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरचा चार स्फोट झाल्याची घटना घडली.या घटनेची माहिती मिळतीच घटना स्थळी धाव घेऊन या आगीवर चार अग्निशामक दलाच्या गाड्याच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले या सिलेंडर च्या स्फोटाच्या आवाजाने आजू बाजूचा परिसर हादरून गेल्याचे नागरिकांनी सांगितले.