पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात ओवेसींचे छायाचित्र नसल्याने महापालिकेसमोर आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
पुणे महानगरपालिकेच्या 2018-19 च्या अंदाज पत्रकात एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असौद्दिन ओवेसी यांचे छायाचित्र लावण्यात आले नाही. त्याच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेसमोर एमआयएमच्या महापालिकेतील गटनेत्या अश्विनी लांडगे यांनी आंदोलन केले.
यावेळी एमआयएमच्या महापालिकेतील गटनेत्या अश्विनी लांडगे म्हणाल्या की,”तीन महिन्यापूर्वी एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असौद्दिन ओवेसी यांचे अंदाजपत्रकात छायाचित्र असावे. या मागणीचे पत्र महापौर,सभागृह नेते,स्थायी समिती अध्यक्ष आणि महापालिका आयुक्तांना दिले होते. सत्ताधारी पक्षसह प्रशासनाने मागणीची दखल न घेतल्याने आज आंदोलन करावे लागले,” असे लांडगे म्हणाल्या. आंदोलन कर्त्यांनी सत्ताधारी पक्षाचा निषेध देखील व्यक्त केला.