पुण्यात उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरचे महिलेसोबत अश्लील वर्तन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील कोरेगाव पार्क भागात एका 26 वर्षीय महिलेसोबत डॉक्टर ने क्लिनिक मध्ये उपचार करण्यासाठी बोलवून तिच्यासोबत अश्लील चाले केल्याची घटना समोर आली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.

या प्रकरणी डॉ. गुरुगोकुल भास्करन गुरुस्वामी (30, रामकृष्ण स्ट्रीट, टीच र कॉलनी, ई रोड, कोईम्तुर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला आणि डॉक्टरची ओळख फेसबुक द्वारे झालेली होती. महिला एका आजाराने त्रस्त होती, त्याविषयी तिने डॉक्टरांना सांगितले होते. डॉक्टरने फेसबुक वर स्वतःचा व्हाट्स ऍप नंबर त्या महिलेला दिलेला होता. आणि तपासणीसाठी महिलेला दवाखान्यात बोलावले होते. महिला जेंव्हा तपासणीसाठी गेली होती तेंव्हा दवाखान्यात इतर कुठला रुग्ण नव्हता. याचाच फायदा घेत उपचाराच्या नावाखाली डॉक्टरने महिलेसोबत अश्लील चाले करण्यास सुरवात केली. ही घटना 8 मार्च दुपारी 3.10 ते 3.25 वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.