प्रभाग क्रमांक 22 पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून सुकन्या गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 च्या पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून सुकन्या गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून मनसे ही निवडणूक लढणार नाही. तर अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर केला नसल्याने या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत दिसणार आहे.

सुकन्या गायकवाड

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आणि माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 6 एप्रिल रोजी निवडणूक आयोगामार्फत या प्रभागासाठी पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून सुकन्या गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये निवडणुकीवेळी आघाडी असल्याने त्यांच्याकडून कोणाला संधी देणार हे पाहावे लागणार आहे. कोद्रे कुटुंबियांमधून कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत मनसे उमेदवार देणार नसल्याने या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत दिसणार आहे.