बंदुकीसोबत सेल्फी काढताना तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील विजयविहार परिसरात बंदुकीसोबत सेल्फी घेताना विजय तरुणांच्या मृत्यू झाला. काल रात्री  साडेनाऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

विजय हा राजस्थानहून दिल्लीत आपल्या काकांच्या येथे कामानिमित्त राहण्यास आला होता. काकांच्या घरात परवाना असलेली बंदुकीसोबत विजय सेल्फी घेत असताना, अचानक गोळी सुटली आणि विजयच्या डोक्याच्या आरपार गेली. या घटनेत विजयचा मृत्यू झाला. या घटनेवेळी छोटू हा तरुण त्याच्या सोबत उपस्थित होता. विजयचे नातेवाईक शेजराच्या छोटू नामक तरुणावर हत्येचा आरोप करत आहेत.

पोलिसांना विजयच्या मोबाईलमध्येकाही फोटो सापडले. या फोटोंमध्ये विजयच्या हातात बंदूक असल्याचे दिसते आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, विजय आणि छोटू दोघेही बंदुकीसोबत सेल्फी घेत होते. त्यावेळी अचानक गोळी सुटून विजयच्या डोक्यातून आरपार गेली. मात्र पोलिसांच्या या अंदाजाला विजयच्या नातेवाईकांनी फेटाळले आहे.