‘बागी 2’ चा बॉक्स ऑफिस वर जोरदार धमाका

मुंबई : वृत्तसंस्था

अभिनेता टायगर श्रॉफचा अॅक्शन सिनेमा ‘बागी 2’ ला बॉक्स ऑफिस वर जोरदार यश मिळाले आहे. पहिल्याच दिवशी (शुक्रवारी) या सिनेमाने या वर्षात रिलीज झालेल्या इतर सर्व सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे मागे टाकत नंबर चे स्थान पटकावले आहे.

‘बागी 2’ ने शुक्रवारी भारतात 25.10 कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा या वर्षातला पहिलाच सिनेमा ठरला आहे. या सिनेमाला शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा होऊन कमाईत कमालीची वाढ होऊ शकते. भारतात 3500, तर परदेशात 625 अशा एकूण 4125 स्क्रीनवर हा सिनेमा जग भर प्रसिद्ध झाला आहे.