बुक्कीने पाडले बस वाहकाचे तीन ‘दात’

बीड: पोलीसनामा ऑनलाईन

एका व्यक्तीकडून पैसे घेऊन पार्सल घेणाऱ्या चालकाला नियमानुसार पावती फाडायला भाग पाडणाऱ्या वाहकाला बस चालकाने मारहाण करून त्याचे तीन दात पाडल्याची घटना परळी बस स्थानकात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी परळी पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की , औरंगाबादहून परळीला निघालेल्या बसमध्ये चालक पठाण यांनी एका व्यक्तीकडून पार्सल स्वीकारले. यासाठी चालकाने व्यक्तीकडून १०० रूपयेही घेतले. ही बाब चालक रमेश क्षीरसागर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पठाण यांना पार्सलची रितसर पावती फाडण्यास सांगितले. त्यांनी पावती फाडण्यास नकार दिल्यानंतर ज्याचे पार्सल आहे, त्या व्यक्तीला पावती असल्याशिवाय पार्सल गाडीत घेणार नाही, असे सांगितले. त्या व्यक्तीने पठाण यांना दिलेले १०० रूपये परत घेतले आणि त्याची रितसर पावती घेतली.

याचा राग मनात ठेऊन पठाण यांनी चालक क्षीरसागर यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत तोंडावर बुक्या मारल्याने क्षीरसागर यांचे तीन दात पडले.