भाजप नेत्याची माओवाद्यांनी केली हत्या

गडचिरोलीः पोलीसनामा ऑनलाईन 

छत्तीसगड :- बीजापुर जिल्हयातील भोपालपटनम गावातील पंचायत समिती सदस्य आणि भाजप नेते जगदीश कोंड्रा यांची माओवाद्यानी हत्या केली आहे. महाराष्ट्राच्या सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर राञी आठ वाजता ही घटना घडली.

जगदीश कोंड्रा आपल्या मिञासोबत घरासमोर बसुन असताना पाच माओवाघांनी घेराव करून कु-हाड व चाकुने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले उपचारासाठी गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा येथे येत असताना रूग्ण वाहिकेत त्याचा मुत्यु झाला.

जगदीश कोंड्रा हे आठ वर्षा अगोदर कंञाटदाराचे काम करीत होते माओवाघांनी यांना धमकी दिली होती त्यानंतर यांनी कंञाटदाराचे काम सोडले होते. जगदीश कोंड्रा माजी जिल्हा परिषद सदस्य होते सध्या पंचायत समिती सदस्य होते. कोंड्रा यांच्या पश्चात दोन मुली पत्नी असा परिवार आहे.