भावानेच केले बहिणीवर लैंगीक आत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पिंपरी येथे घडली आहे. भावानेच बहिणीला मारहाण करुन तिच्यावर आत्याचार केले. हा प्रकार मागील पंधारा दिवसांपासून सुरु होता. अखेर त्या पिडित महिलेने काल रात्री पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत भावा विरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी 32 वर्षीय भावावर लैगीक आत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पिडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडित महिला नात्याने बहिण भाऊ आहेत. आरोपीने पंधरा दिवसांपासून तिला मारहाण करुन आणि जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर आत्याचार केले. काल पिडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत करत आहेत.