मंदिरे तोडली म्हणून पूल कोसळला – राज बब्बर

उत्तरप्रदेश वृत्तसंस्था

मंगळवारी वाराणसीमध्ये एक पूल कोसळून १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला . ज्या ठिकाणी हा पूल कोसळला तिथे या आधी तीन गणपतींची मंदिरं तोडण्यात आली होती. मंदिरं तोडल्यामुळे पूल कोसळला असा दावा काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी केला.

राज बब्बर यांनी आज (बुधवारी) घटनास्थळी जावून पाहणी केली आणि जखमींची विचारपूस केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज बब्बर म्हणाले की, “या पूलाचं बांधकाम सुरू करण्याआधी तीन गणपतीची मंदिरं तोडण्यात आली होती. यासाठी लोकांचं म्हणणं आहे की मंदिर तोडल्यामुळे देवाचा शाप झाला”

यावेळी राज बब्बर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. वाराणसी हा नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. त्यांनी यायला हवे होते परंतु, ते कर्नाटकच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. असा टोला बब्बर यांनी लगावला. तसंच राज बब्बर यांनी मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत मिळावी अशी मागणी केली आहे.