मनपा आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात बदली

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

केंद्र आणि राज्य शासनाला अपेक्षित स्मार्ट सिटी, चोवीस तास पाणी पुरवठा , केबल डक्ट, सायकल योजना अशा एक ना अनेक योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविताना अक्षरश: नागरिकांचा रोष पत्करणारे आयुक्त कुणाल कुमार यांची आज केंद्रशासनाने केंद्रात गृहनिर्माण विभागाच्या सह सचिव पदी बदली करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अनेक अधिकारी वर्गाने काम केले आहे.मात्र सर्वाधिक काळ कुणाल कुमार यांनी म्हणून काम पाहिले आहे.त्यांच्या अगोदर महापालिका आयुक्त म्हणून विकास देशमुख यांनी अगदी काही महिने काम पाहिले होते. त्यांच्या नंतर कुणाल कुमार यांनी महापालिकेची साडे तीन वर्षांहून अधिक काळ धुरा त्यांनी सांभाळली.त्यांच्या कार्यकाळात नदी सुधार प्रकल्प,चोवीस तास समान पाणी पुरवठा,स्मार्ट सिटी प्रकल्प आणि केबल डक्ट हे विषय खूप गाजले. हे विषय मंजुरीसाठी आले असताना विरोधकांनी नेहमीच त्यावर आक्षेप घेतले.तर आयुक्तांना अनेक विषयात कोंडीत पकडण्याचे लोकप्रतिनिधींनी केले आहे. मात्र या सर्वावर नेहमीच महापालिका आयुक्तांनी मात केल्याची पाहावयास मिळाली आहे. त्यांची बदली केव्हा होणार याकडे अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते.आज राज्यशासनाने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात गृहनिर्माण विभागाच्या सह सचिव पदी बदली करण्यात आली आहे.तर आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती केली जाते. हे पाहावे लागणार आहे.

पुणे माहापालिकेत साडेतीन वर्ष काम करण्याचा अनुभव मिळाला हे माझे भाग्य समजतो. या साडेतीन वर्षाच्या काळात शहर विकासाच्या दृष्टीने काम करण्याची संधी मिळाली. विविध प्रकलपांवर काम करता आले. हा माझ्या साठी मोठा अनुभव होता, हे मी कधीही विसरू शकणार नाही. केंद्र शासनाच्या गृह निर्माण विभागात माझी नियुक्ती झाली आहे. तेथे मला स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम करण्याची संधी मिळणार आहे. केंद्र शासनाने माझी ऑर्डर काढली तरी पुढील बदलीची प्रक्रिया राज्य शासनाकडून पूर्ण होईल. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मी केंद्रात रुजू होईल. – कुणाल कुमार, पुणे महापालिका आयुक्त.

पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह देशातील २९ अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत.