महिलांनी संक्रांतीला सूर्याची पुजा का करावी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदू धर्मात सणांचे महत्व अधिक आहे. म्हणजे सण म्हणलं की उत्साह प्रसन्नता दरवळ्ते , दिवाळी , दसरा हे जितके महत्वाचे सण आहेत तितकाच महत्वाचा सण म्हणजे संक्रांत होय, या सणाला साडेतीन मुहूर्तापैकी एक मानलं जातं. महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी हा सण खास महत्वाचा असतो. १५ जानेवारीला रात्री सुर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे १५ जानेवारीला मकर संक्रांतीला पुण्याचा काळ मानले जाते. या दिवशी तिळाने स्नान आणि दानधर्म करण्याला महत्व असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सुर्यदेवाची पुजा करुन सकाळी सुर्याला अर्घ्य देत असताना काही विशेष मंत्रांचा जाप केल्यास लाभदायक असते.
चला तर पाहुया कोणता आहे मंत्र आणि त्याचा विधी…
सुर्य मंत्र स्तुति
नमामि देवदेवशं भूतभावनमव्ययम्।
दिवाकरं रविं भानुं मार्तण्डं भास्करं भगम्।।
इन्दं विष्णुं हरिं हंसमर्कं लोकगुरुं विभुम्।
त्रिनेत्रं त्र्यक्षरं त्र्यङ्गं त्रिमूर्तिं त्रिगतिं शुभम्।।
हा विधि करुन करा मंत्राचा जाप
– मकर संक्रांतीच्या सकाळी स्नान करुन एका तांब्याच्या लोट्यात शुद्ध पाणी घ्या. त्यात लाल फूल आणि कुंकू टाका.
– त्यानंतर हळुहळु सुर्याला अर्घ्य देत मंत्राचे उच्चारण करा.
– सुर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर हातात रुद्राक्षाची माळा घेऊन कमीत कमी पाचवेळा जाप करा.
– मंत्राचा जाप केल्यानंतर सुर्यदेवाकडे हात जोडून तुमची मनोकामना मागा.
– अशाप्रकारे मकरसंक्रांतीच्या दिवशी तुम्ही पुजा आणि मंत्राचा जाप केल्यास तुमच्या घरात सुख-समृद्धी लाभेल आणि तुमच्यावर सुर्यदेवाची कृपा राहील.
सूर्य पूजेला शास्त्रात खूप महत्व दिले जाते. कारण, घरातील लोकं निरोगी राहतील, महिलांना आर्थिक लाभ होईल, येणारे संकट टळेल.