माहिमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला २० हजारांची लाच घेताना अटक

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन
माहिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद इडेकर आणी ऑर्डरली यांना एका बार मालकाकडून 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे. बेकायदेशीर डान्स बारला अभय देण्याच्या प्रकारातून लाचेची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला लाच घेताना अटक केल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावला होता. इडेकर यांना एका खाजगी व्यक्ती मार्फत 20 हजाराची लाच घेताना अटक केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक सुत्रांनी दिली आहे. रात्री उशीरापर्यंत इडेकर यांच्या घराची झडती सुरू होती.