मिलिंद एकबोटे यांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
कोरेगाव भिमा प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटेंना पुणे ग्रामीण पोलीसांनी राहत्या घरातून अटक केली. एकबोटेंचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता तेंव्हाच त्यांच्या सुटकेचा मार्ग बंद झाला होता. अटक टाळण्यासाठी एकबोटेंच्या वतीने पुणे जिल्हा सत्र न्यायालयत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत (अ‍ॅट्रॉसिटी) त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चिथावणी देणे, दगडफेकीस प्रवृत्त करणे, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीपोटी एकबोटे यांनी पुणे सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र एकबोटे यांच्यावर दाखल असलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले होते. यानंतर उच्च न्यायालय व आता सर्वोच्च न्यायालयाने एकबोटेला जामीन नाकारला आहे.