मुलीच्या लग्नादिवशीच जळाले घर

दिघी : पोलीसनामा ऑनलाईन

एकीकडे मुलीच्या लग्नाचे विधी सुरु असताना दूसरीकडे घर जळत होते. ही घटना घडली आहे दिघी येथील वडमुखवाडी येथे. आज दुपारी तीनच्या सुमारास वडमुख वाडी येथील जेनीस अपर्टमेंटमध्ये एका फ्लॅटला आग लागली. यामध्ये संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. परंतू मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मच्छिंद्र आश्रूबा खेडेकर यांचा जेनीस अपर्टमेंटमध्ये आकराव्या मजल्यावर लक्झरीयस फ्लॅट आहे. खेडेकर यांच्या मुलीचे आज आकुर्डीयेथे लग्न होते. लग्न संमारंभासाठी घरातील सर्वजण आकुर्डीत गेले होते. त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या घरातून धुर येत असल्याचे नागरिकांना दिसून आले.

नागरिकांनी घटनेचे गांभीर्य़ ओळखून अग्निशम दलाला आगिची माहिती दिली. पिंपरी आणि भोसरी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून ही आग विझवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घरामधून तीन एलपीजी सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.