‘रेड’ वर्दी शिवाय दरार

ADV

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
सिंघम, गंगाजल, जमीन अशा विविध चित्रपटांत खाकी वर्दीचा दरारा दाखवणारा अभिनेता अजय देवगण ‘रेड’ चित्रपटात मात्र अंगावर वर्दी नसतानाही या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘हीरो हमेशा यूनिफॉर्म मे नहीं आते!’ अशा टॅग लाइनने अजयने ‘रेड’मधील प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. आयकर विभागाच्या धाडींवर आधारित हा चित्रपट आहे. अर्थात साहसी पटांसाठी लोकप्रिय असलेल्या अजयने साकारलेली तगडी भूमिका हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.

१९८१ मध्ये लखनऊमध्ये आयकर विभागाने ‘हाय प्रोफाइल’ करबुडव्यांवर धाडी टाकून देशभरात खळबळ उडवून दिली होती. देशभर गाजलेल्या या कारवाईवर हा चित्रपट आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

ADV

अमेय पटनायक (अजय देवगण) आपल्या पथकासह खासदार आणि राजकीय नेता रामेश्वर सिंह ऊर्फ राजाजी सिंहच्या (सौरभ शुक्ला) ठिकाणांवर छापा टाकतो. स्वत:चा बचाव करण्यासाठी राजाजी पूर्ण ताकद लावतो, दबाव आणतो, मात्र अमेय त्यापुढे झुकत नाही. एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची भूमिका या चित्रपटातून दिसणार आहे. सध्या विविध समाज माध्यमांमध्ये ‘रेड’ चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर सर्वात जास्त लोकप्रिय होत आहे.