वडगाव पुलावर दुचाकी घसरुन संगणक अभियंत्याचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

भरधाव वेगात जाणा-या संगणक अभियंता तरुणाची दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.4) सकाळी सहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील वडगाव पुलावर घडली.

निकेत राजेंद्र पाटील (वय -22,रा. मानाजीनगर, न-हे, मूळ रा. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकेत एका आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामाला होता. शनिवारी रात्री तो आपल्या मित्राकडे गेला होता. रविवरी सकाळी तो मित्राच्या घरुन दुचाकीवरुन भरधाव वेगात निघाला. वडगाव पुलावर आला असता त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. पाठिमागून येणा-या एका वाहनचालकाने या अपघताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन निकेतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. घाडगे तपास करत आहेत.