विजेच्या धक्क्याने बीडमध्ये शेतक-याचा मृत्यू

बीडः पोलिसनामा आॅनलाईन

दिंदृड येथे वीज जोडणी करण्यासाठी विद्यूत खांबावर चढलेल्या शेतकऱ्याचा अचानक विद्यूत प्रवाह सुरू झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. बळी माने असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार वीज वितरण कंपनीच्या उपाभियंत्यासह एकाही कर्मचाऱ्याला विद्यूत पोलवर चढता येत नसल्याने ५० रुपयांचे आमिष दाखवून शेतकऱ्याला विद्यूत पोलवर चढवण्यात आले. वीज जोडणीचे काम चालू असताना वीज वितरण कंपनीच्या भेजबाबदार कामा मुळे आणि गलथान कारभारामुळे अचानक विद्यूत प्रवाह सुरू झाला. याचवेळी पोलवर चढलेल्या बळी माने या शेतकऱ्याला जोराचा झटका बसला. विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बीड मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

शेतकऱ्याचा मृत्यू हा वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे झाल्याचे समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. यावेळी शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या उपाभियंत्यास आणि दोन कर्मचाऱ्यांना चोप दिला. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही कर्मचाऱ्याना ताब्यात घेतले असून पोलिस पुढील तपास सुरू आहे.