विद्यापीठातील उपोषणकर्त्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सिंहगड शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषनाची 9 दिवसानंतर देखील दखल न घेतल्याचे चित्र सुरुच असून विद्यार्थी अाजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

विद्यार्थ्यांनी मागील 9 दिवसापासून विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरु केले होते. मात्र मागील 4 दिवसापासून आमरण उपोषणास बसलेल्या सिताराम गोसावी या विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने त्यास उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिंहगड शिक्षण संस्थेतील प्राध्यापक मागील 14 महिन्यापासून पगार न झाल्याने संपावर आहेत. त्यामुळे हजारो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासन आणि सरकार संबधित प्रकरण गांभीर्याने हाताळत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, अशी भिती पालक आणि विद्यार्थ्यांना वाटत आहे.