व्हॉटस एपवरील मेसेज साठ मिनिटांनंतरही होणार डीलीट

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
व्हॉट्सअॅपनं (whatsapp) बीटा यूजर्ससाठी आणखी एक अपडेट सुरू केले आहे. व्हॉट्सअॅपचे २.१८.६९ श्रेणी वापरकर्त्याना आता व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज ६८ मिनिटांनंतरही डीलीट करता येऊ शकतो.

व्हॉट्सअॅपनं नुकतेच ‘डीलीट फॉर एव्हरीवन’ हे फीचर आणले होते. याआधी ‘डीलीट फॉर एव्हरीवन’साठी ७ मिनिटांचा अवधी होता. आता मात्र, या वेळेत वाढ करण्यात आली असून ६८ मिनिटांनंतरही पाठवलेला मेसेज देखील डीलीट करता येणार आहे. या अपडेटची माहिती व्हॉट्सअॅप ट्रॅकर WABetaInfo ने एका ब्लॉगद्वारे दिली आहे. हे नवीन अपडेट फक्त अँड्रॉइडच्या बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. ‘आयओएस’ यूजर्सना अद्याप ही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे त्यांना आणखी वाट पाहावी लागेल.