शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरामध्ये पहाटे मीटर बॉक्सला आग

पुणे पोलिसनामा ऑनलाईन

पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती पायथा येथील राहत्या घरी पहाटे चारच्या सुमारास आगीचा प्रकार घडला. ते राहत असलेल्या ठिकाणी आगीची घटना घडल्याचे समजताच पोलिसांची जादा कुमक ही तातडीने हजर झाली.

पहाटे चार वाजता अग्निशमन दलाकडे स्वत: बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या घरी मीटर बॉक्सला आग लागली असून मदतीची मागणी केली. त्याचवेळी अग्निशमन मुख्यालयातून लगेचच दोन वाहने रवाना करण्यात आली. घटनास्थळी मीटर बॉक्स बसवलेले लाकूड व मीटटर बॉक्स हे जळाले होते. अग्निशमन दलाचे जवान व महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळाचे कर्मचारी तसेच पोलिसांनी तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट होऊन आग लागली की अन्य काही कारण असेल याचा तपास अग्निशमन दल व पोलिस करीत असून मोठा अनर्थ टळल्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तातडीने उपस्थित झालेले अग्निशमन दल, पोलिस विभाग, विद्यूत मंडळ यी यंत्रणेचे मनपुर्वक आभार मानले आहेत.