शिवसृष्टी बाबत उद्या मुख्यमंत्र्या समावेत होणार बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे शहरातील कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्ट्री बाबत मागील कित्येक वर्षांपासून राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. त्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात झालेल्या सर्व साधारण सभेत शिवसृष्टी झालीच पाहिजे.अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. तर या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्र्यासमावेत बैठक आयोजित केली जाईल. असे आश्वसन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले होते. त्यानुसार शिवसृष्टी आणि मेट्रोचे स्थानक उभारण्यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी उद्या मंगळवारी दुपारी एक वाजता मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागी पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गावरील मेट्रोचा डेपो प्रस्तावित आहे. तर त्याच ठिकाणी शिवसृष्टी देखील प्रस्तावित करण्यात आली असून काही तांत्रिक बाबीमुळे मागील नऊ वर्षांपासून शिवसृष्टीचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नावर अनेक वेळा महापालिकेच्या सभागृहात चर्चा करण्यात आली. मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढण्यात अपयश आल्याने मागील आठवड्यात महापालिकेच्या सर्व साधारण सभेत विरोधी पक्षांनी शिवसृष्टी झालीच पाहिजे अशी मागणी केली. जर येत्या ११ तारखेपर्यंत शिवसृष्टी प्रकल्पाचा विषय मार्गी न लागल्यास मेट्रोचे काम बंद पाडू आणि आंदोलनाचा इशारा माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांनी सभागृहात सताधारी पक्षाला दिला होता.त्यानंतर अनेक नगरसेवकांनी शिवसृष्टी प्रकल्प मार्गी लागावा. अशी भूमिका सभागृहात मांडली. या सर्वांच्या भावना लक्षात घेता. महापौरांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समावेत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या सर्व घडामोडीनंतर ही बैठक केव्हा आयोजित केली जाते. याकडे विरोधी पक्षांचे लक्ष लागून होते. त्यानुसार उद्या मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समावेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.