सर्व कंपन्यांचे प्लॅन एकाच ठिकाणी, ‘ट्राय’ची नवी वेबसाईट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (‘ट्राय’)ने ग्राहकांना सर्व दूरसंचार कंपन्यांच्या ‘टेरिफ प्लॅन’ची माहिती देण्यासाठी नवे संकेतस्थळ सुरु केले आहे.

‘ट्राय’चे नवे संकेतस्थळ http://tariff.trai.gov.in या वर वेगवेगळ्या कंपन्यांच्या टेरिफ प्लॅन्सची माहिती डाऊनलोड करता येते. या सुविधेमुळे ग्राहकांना सर्व कंपन्यांच्या टेरिफ प्लॅनशी तुलना करुन योग्य तो प्लॅन निवडता येईल, असे ‘ट्राय’ने अधिकृत पत्रात म्हटले आहे.

या संकेत स्थळावर ग्राहकांना प्रतिक्रिया,मत देता येईल. ग्राहक मोबाईल, लँडलाईन, प्रीपेड, पोस्टपेड आणि सर्कलनुसार ऑपरेटर्स निवडून आपला प्लॅन निवडू शकतात. हे संकेतस्थळ नुकतेच सुरू झालेले असल्याने सध्या यावर केवळ दिल्ली सर्कल उपलब्ध आहे. लवकरच इतर महत्वाची शहरे दिसतील अशी अपेक्षा आहे.