Mumbai : डोंगरी परिसरातून 1 कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईतल्या डोंगरी परिसरातल्या फेब हाऊसमध्ये धाड टाकून 1 कोटी 10 लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच 8 लाख 78 हजारांची रोकडही जप्त केली आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक केली आहे.

सनम तारीक सय्यद (25) या महिलेला ड्रग्ज आणि रोख रक्कमेसहित अटक केली आहे. कारवाईत 1 किलो 105 ग्रॅम मेफीड्रॉन नावाचे ड्रग्ज जप्त केले असूून त्याची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये आहे. तसेच 8 लाख 78 हजारांची रोकडही जप्त केली आहे. गेल्या महिन्याभरात लाखो, करोडो रुपयांच्या ड्रग्जतस्करीत सहभागी असणाऱ्या दोन महिलांना अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

नुकतेच कुर्ल्यातून एका महिलेला ड्रग्ज विक्रीप्रकरणी अटक केली होती. पोलिसांनी सबिना खान या आरोपीला अटक केल्यानंतर तिच्याकडून ड्रग्ज देखील जप्त केले होते. गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज संबंधी अनेक कारवाया समोर येत आहेत. यामध्ये अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांचीही नावे समोर आली आहेत. त्यानंतर सतत ड्रग्ज पॅडलर्सविरोधी कारवायाचे सत्र सुरुच आहे.