विधायक ! १०० ‘अ‍ॅनिमिया’ झालेल्या विद्यार्थ्यांवर ‘त्या’ कलेक्टरांनी केले स्वतःच्या घरी उपचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीधीमध्ये बुधवारी १०० पेक्षा आधिक अ‍ॅनिमिया म्हणजे रक्ताची कमी असल्याने पीडित मुलांना रुग्णालयात रक्त चढवण्यासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर जागा कमी पडली, याची माहिती आरोग्य आधिकाऱ्याने कलेक्टर अभिषेक सिंह यांना संपर्क साधून दिल्यानंतर कलेक्टर यांनी त्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी बोलावून घेतले आणि तेथेच त्यांच्यावर उपचार करुन घेतले. याशिवाय त्या मुलांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था देखील केली.

दस्तक अभियान सुरु करण्यात आलेल्या मध्यप्रदेशात आतापर्यंत सीधी जिल्ह्यात ८३० अ‍ॅनिमिया ग्रस्त मुले आढळली आहेत. त्या मुलांना रुग्णालयात रक्त चढवले जाणार आहे. कलेक्टरने सांगितले की दस्तक अभियानात प्रत्येक गंभीर अ‍ॅनिमिया मुलाचे ब्लड ट्रांसफ्युजन करण्यात येणार आहे. यावेळी कलेक्टर कडून त्या मुलांना घरी घेऊन येणे, त्यांना ब्लड ट्रांसफ्युजन करणे, त्यांची थांबण्याची व्यवस्था करणे, जेवण आणि पुन्हा घरी सोडण्याची व्यवस्था करणे हे सर्व या कलेक्टरकडून करण्यात आले.

कलेक्टर अभिषेक सिंह यांनी सांगितले की, दोन दिवसात जवळपास ८०० पेक्षा आधिक अ‍ॅनिमिक मुले आले. ब्लड ट्रांसफ्युजननंतर आता २५ ते ३० मुलं बाकी आहेत. बाकी मुलांना जिल्हा रुग्णालयात, खासगी रुग्णालयात आणि मानस भवन मध्ये ठेवण्यात आले आहे. बुधवारी सिहावल भागातून १०० पेक्षा आधिक मुले आली होती. त्यांना थांबायला जागाच नव्हती. त्यांनी त्यांना बंगल्यात थांबण्यासाठी व्यवस्था केली. उपचारा पर्यंत ही मुले तेथेच असतील.

मुख्यमंत्र्यांनी केले कौतूक

कलेक्टरच्या या कामाचे मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देखील कौतूक केले. त्यांनी त्यांचे कौतूक करत ट्विट केले की, मुलांसाठी सर्व व्यवस्था करुन देणे कौतुकास्पद आहे.

आरोग्यविषयक वृत्त