नवी दिल्ली : 12 BJP MP Resign | नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) खास रणनितीची भाग म्हणून भाजपाने चक्क २१ खासदारांना आमदारकीची निवडणूक लढवण्यास सांगितले होते. यापैकी आमदार म्हणून निवडूण आलेल्या खासदारांनी त्यांच्या संसदेच्या सदस्यत्वाचा आता राजीनामा देणे कायद्यानुसार आवश्यक ठरते. यामुळे भाजपाच्या निवडूण आलेल्या १० खासदारांनी राजीनामे (12 BJP MP Resign) दिले असून आणखी २ खासदार राजीनामे देणार आहेत.
विधानसभा निवडणुक लढवून त्यात विजय मिळविणाऱ्या खासदारांना १४ दिवसांत विधानसभा की संसदेचे सदस्यत्व कायम ठेवायचे याचा निर्णय घ्यावा लागतो. राज्यघटनेमध्ये तशी तरतूद आहे. याबाबत, भाजपच्या कोअर किमटीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत १२ खासदारांनी राजीनामा देण्याचे ठरवण्यात आले.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (BJP President JP Nadda) यांच्या नेतृत्त्वात या खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना भेटल्याची माहिती आहे. भाजपने राजस्थान, मध्य प्रदेशात प्रत्येकी ७, छत्तीसगडमध्ये ४, तेलंगणामध्ये ३ खासदारांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले होते. (12 BJP MP Resign)
भाजपाच्या या खासदारांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली –
- मध्य प्रदेश
केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर, प्रल्हाद सिंग पटेल, राकेश सिंग, उदय प्रताप, रिती पाठक - छत्तीसगड
अरुण सावो, गोमती साई - राजस्थान
राज्यवर्धनसिंग राठोड, दिया कुमारी, किरोदी लाल मिना, बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह
१२ खासदारांनी राजीनामा दिल्याने भाजपाचे संसदेतील संख्याबळ १२ ने कमी होणार आहे. आगामी लोकसभेची निवडणूक चार महिन्यात असल्याने या जागांसाठी पोटनिवडणूक होऊ शकत नाही. आमदार झालेल्या या नेत्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाऊ शकते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
डर्टी पिक्चर ! पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार, वाघोली परिसरातील घटना