Sanjay Raut | बिघडलेल्या आरोग्य सेवेला संजय राऊतांचा ‘लेटर डोस’, मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात खळबळजनक आरोप!

मुंबई : शिवसेना (Shivsena Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील बिघडलेल्या आरोग्य सेवेची (Health Department) माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात राऊत यांनी अतिशय गंभीर असे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य खात्यातील मंत्री आणि अधिकारी पातळीवरील भ्रष्टाचार राऊत (Sanjay Raut) यांनी उघड केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर मुद्द्यावर कशाप्रकारे अ‍ॅक्शन घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत जबाबदार
खासदार संजय राऊत यांनी राज्यातील आरोग्य सेवेवरुन एकनाथ शिंदे सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नियमबाह्य बढत्या आणि बदल्या हा आरोग्य विभागातला चिंतेचा विषय आहे. यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) जबाबदार आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेचे धिंडवडे निघाले आहेत. एकेकाळी आपली आरोग्य सेवा संपूर्ण देशात अव्वल होती. आरोग्य अधिकाऱ्यांना आज बॉसला खंडणी द्यावी लागते आहे.

५० कोटी मंत्र्यांपर्यंत पोहोचविले
पत्रात संजय राऊत यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील एकूण १२०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी प्रत्येकी चार लाख असे एकूण साधारण ५० कोटी रुपये जमा केले. हे संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्या वसुलीसाठी एका खास ओएसडीची नियुक्ती करण्यात आली.

प्रति बेड एक लाख रुपये घेतात
गंभीर आरोप करताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुढे म्हटले आहे की, सध्या महात्मा ज्योतीराव फुले योजना (Mahatma Jyotirao Phule Yojana) लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून प्रति बेड एक लाख रुपये घेतले जातात. याचा अर्थ या योजनेत बोगस लाभार्थीची भरमार असून खोटी बिले, खोटे रुग्ण यावर कोट्यवधी रुपये संबंधित मंत्र्यांना पोहोचवले जात आहेत.

आरोग्य खाते पूर्णपणे सडले
आरोग्य खाते जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या खात्याची दोन्ही संचालकपदे रिक्त ठेवली असून त्याचा लिलाव पद्धतीने सौदा करण्याची मंत्री महोदयांची योजना आहे. भ्रष्टाचार व सावळा गोंधळ यामुळे आरोग्य खाते पूर्णपणे सडले आहे. ३४ पैकी १२ कनिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे सिव्हिल सर्जनपदी नियुक्ती दिली. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला आहे.

आकडा मुडद्यांनाही धक्का देणारा
संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांत सीएस कॅडर नसलेल्या दोघांना सिव्हिल सर्जन म्हणून नियुक्ती दिली. यामागे झालेल्या अर्थकारणाचा आकडा मुडद्यांनाही धक्का देणारा आहे.

नियुक्तीसाठी प्रत्येकी ५० लाखांची मागणी
पत्रात पुढे म्हटले आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १४ उपसंचालकांची निवड झाली, पण त्यांच्याकडे नियुक्ती साठी प्रत्येकी ५० लाखांची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने त्यांना एकजात साईड पोस्टिंग मुंबई-पुण्यात दिल्या. त्यांच्याकडे पोस्टिंगसाठी पैशांची मागणी आजही सुरू आहे.

लिलाव पद्धतीने बदल्या-बढत्या
नाशिक, लातूर येथे राज्य लोकसेवा आयोगाचे उपसंचालक असताना ५०-५० लाख रुपये घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांना
पदे दिली. छत्रपती संभाजीनगर, अकोला येथील पदे रिक्त ठेवली.
एमपीएससीचे उपसंचालक असतानाही ही पदे रिक्त ठेवण्यामागे पैशांची लालसा हेच कारण आहे.
आरोग्य खात्यात लिलाव पद्धतीने अशा बदल्या-बढत्या पदस्थापना व्हाव्यात हे या राज्याचे दुर्दैव आहे.

डॉ. सारणीकर यांची नियुक्ती धक्कादायक
या पत्रात पुढे म्हटले आहे की, डॉ. प्रतापसिंह सारणीकर हे जिल्हा आरोग्य अधिकारी या यादीत १११ क्रमांकावर आहेत.
उपसंचालक यादीत त्यांचे नाव नाही तरी त्यांना दोन टप्पे ओलांडून सहसंचालकपदी नियुक्ती करणे हे धक्कादायक
तसेच यामागे अर्थकारण आहे याचा पुरावा आहे.

८ कोटी कात्रज मुक्कामी पोहोचवले
आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार कोणत्या थराला गेला आहे याचे उत्तम उदाहरण म्हणून जळगाव प्रकरणाकडे पाहता येईल.
२०२० च्या कोविड खरेदीत अनियमितता आहे म्हणून डॉ. नागोराव चव्हाण (जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव) यांना
निलंबित करण्यात आले. परंतु त्याच खरेदी व्यवहारातील १८ कोटी रुपये संबंधित ठेकेदार कंपनीस वितरित करण्यासाठी
मंत्र्यांकडून दबाव आला व तीन वर्षांनंतर त्यास आता प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
या व्यवहारातील ८ कोटी रुपये कात्रज मुक्कामी पोहोचवण्यात आले.

पैसे जमा करण्यासाठी उपसंचालकची नियुक्ती
गेल्या वर्षभरात आरोग्य खात्यात भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा पार केल्या. पैशांची मागणी करण्यासाठी व पैसे जमा
करून घेण्यासाठी एका उपसंचालक पदाच्या अधिकाऱ्याची खास नियुक्ती केली असून सर्व पैसे संबंधित
मंत्रीमहोदयांच्या कात्रज येथील खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जमा केले जातात.

भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी
आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, खासकरून महात्मा ज्योतीराव फुले योजनेतील बेकायदेशीर कामांची
चौकशी व्हावी, असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात केले आहे.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रावर मुख्यमंत्री गांभिर्याने विचार करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देतात की आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde-Dhananjay Munde | मुंडे भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर, पंकजा यांच्या मिश्किल टिप्पणीला उपस्थितांची दाद, ”आज पारा जरा जास्तच…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | क्रेडीटवर हायड्रोलिक मशीन घेऊन पावणे सहा कोटींची फसवणूक, महाळुंगे परिसरातील प्रकार

Mrunal Thakur Airport Look | एअरपोर्टवर ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली मृणाल ठाकूर, पाहा व्हायरल कॅज्यूअल लूक…

Shahrukh Khan Spotted At Airport | एअरपोर्टवर किलर लूकमध्ये दिसला शाहरूख खान, एका झलकसाठी चाहत्यांना लागलं वेड…