Pune : आईने TV पाहू न दिल्याने 13 वर्षीय मुलाची आत्महत्या; चिखली परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आईने टीव्ही पाहू न दिल्याने रागाच्या भरात एका 13 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरामध्ये घडली.

रमजान अब्दुल शेख असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमजानला टीव्ही पाहायला खूप आवडत होते. मात्र, यावरून त्याची आई त्याच्यावर रागवत असे. टीव्ही पाहू न दिल्याने अशाच एका वादाचा राग मनात धरून रमजानने मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, रमजानने गळफास लावल्याचे घरातील व्यक्तींच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवलं. तसेच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

रमजानला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी रात्रीपासून रमजानची प्रकृती सातत्याने खालावत गेली. त्यामुळेच बुधवारी त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला.