मनपा क्षेत्रात 14 जणांना प्रवेश बंदी

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्यांना महापालिका क्षेत्रात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामध्ये सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 14 जणांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी काढले आहेत. दि. 5 ऑगस्टपर्यंत ही बंदी असणार आहे.

प्रवेश बंदी केलेल्यांमध्ये अनिल रघुनाथ नलवडे (रा. कवलापूर), विरेंद्र नारायण तांबवेकर (रा. हरिपूर), फिरोज ऊर्फ गोट्या दिलावर नरंदेकर (रा. कसबेडिग्रज), सुनील सुरेश बिराजदार (रा. बुधगाव), विजय ऊर्फ पप्पू बजरंग फाकडे (रा. हरिपूर), सुशील उदय सावंत (रा. बुधगाव), सुकुमार मल्लाप्पा सवदे (रा. इनाम धामणी), विकास बाबुराव शिंदे (रा. हरिपूर), महेश दिनकर बोंद्रे (रा. हरिपूर), दिग्वीजय कुंडलिक बोंद्रे (रा. हरिपूर), निशिकांत दिनकर बोंद्रे (रा. हरिपूर), अमीर खुदबुद्दीन शेरकर (रा. बुधगाव), उमेश रमेश कोलप (रा. अंकली), ओंकार चंद्रकांत भोरे (रा. अंकली) यांचा समावेश आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’96ddb181-8773-11e8-9f38-4f97a011448d’]

या सर्वांवर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे महापालिका क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या 14 जणांना महापालिका क्षेत्रात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

मतदानादिवशी तीन तास मुभा

दरम्यान यातील ज्याचे महापालिका क्षेत्रात मतदान आहे. त्याला मतदानादिवशी सकाळी 8 ते अकरा या काळात महापालिका क्षेत्रात येण्यास मुभा देण्यात आल्याचेही आदेशात म्हटले आहे.