पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी २५ कोटींचा निधी ; पालकमंत्र्यांची घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ज्यांच्या जीवावर आपण घरात निवांत झोपू शकतो, त्यांची घरे मात्र मोडकळीला आली आहेत. अशा शहरातील पोलीस वसाहतीतील घरांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आली असल्याची घोषणा महसुल व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली. पाटील यांच्या या घोषणेने शहरातील पोलिसांच्या गळक्या घरांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी सर्व मंत्र्यांना दिवाळीत पोलीस वसाहतीत जाण्यास सांगितले होते. दिवाळीत मी कोल्हापूरातील पोलीस वसाहतींना भेटी दिल्या. तेव्हा तेथील पोलिसांना बाथरुममध्ये छत्री घेऊन बसावे लागते अशी वसाहतीची स्थिती असल्याचे दिसून आले. त्यामुळे पुणे शहरातील पोलीस वसाहतीतील घरांच्या दुरुस्तीचा २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव समोर आला. तेव्हा मी तातडीने त्याला मंजुरी दिली.तसेच ट्रॅफिक पोलीस अवेरनेस सेंटर आणि ट्रॅफिक पार्कसाठी ५ कोटी रुपयांचा निधी कालच मंजुर केला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –