Thane : काय सांगता ! होय, ‘या’ कार्यालयात इंटरनेटअभावी रद्द झालं 15 जोडप्यांचं लग्न, संतप्त नातेवाईकांचा ऑफिसमध्ये गोंधळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या एक दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे वधू-वरांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे सरकारी नियमांचे पालन करत मोजक्या लोकांमध्ये कमी खर्चात विवाह सोहळा पार पाडण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. ठाण्यातील Thane दुय्यम निबंधक कार्यालयातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. मात्र, शुक्रवारी येथील कार्यालयातील इंटरनेट बंद पडल्याने १५ जोडप्यानं विवाह रद्द करावा लागला. या घटनेमुळे संतप्त नातेवाईकांनी कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले.

‘वीज कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन वर्कर दर्जा देऊन 50 लाखांचे विमा संरक्षण द्या’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

कोरोनामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यातच संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने अनेकांनी कमी खर्चात आणि सरकारी नियमांचे पालन करत नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास पसंती दिली आहे. विवाहाचे मुहूर्त मे महिन्यात असल्यामुळे ठाणे Thane येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दिवसाला सुमारे २५ ते ३० जणांचे विवाह होत असतात. शुक्रवारी सकाळी १० वाजताच या कार्यालयातील इंटरनेट सेवा खंडित झाली होती. तसेच, कार्यालयातील मनुष्यबळही कमी होते. याबाबतची एमटीएनएलकडे अधिकाऱ्यांनी तक्रार केली. दोन तास झाले तरी काही सेवा सुरु झाली नाही. विवाहासाठी १५ जोडपी आणि त्यांचे नातेवाईक ताटकळत उभे होतेच. शेवटी इंटरनेट खंडित झाल्याने तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार, कार्यालयात अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने विवाहनोंदणीचे कामकाज होणार नसल्याची अधिकाऱ्यांनी १२ वाजता नोटीस लावली. त्यामुळे सर्वांचाच हिरमोड झाला. तर नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांनाही बोलवावे लागले. गेल्या आठवड्यातही इंटरनेटसेवा खंडित झाल्यामुळे ४० जोडप्यांना घरी परतावे लागले होते.

मासिक पाळीदरम्यान कोरोना व्हॅक्सीन घेणे किती सुरक्षित ? जाणून घ्या एक्सपर्टकडून

वधू-वर आणि त्यांचे नातेवाईक सकाळी १० वाजता कार्यालयात आले आहे. इंटरनेट सकाळपासूनच नाही. त्याबाबत आधी सूचना दिली असती तर गोंधळाचा विषय नव्हता. मात्र १२ वाजता १२ वाजता विवाह होऊ शकत नसल्याची नोटीस लावली गेली त्यामुळे नातेवाईकांनी इतका वेळ का सांगितले नाही म्हणून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. सातत्याने ही समस्या येत असतानाही यावर उपाययोजना केली जात नाही. याबाबत नातेवाईकांनी जाब विचारल्यास पोलिस लाठीचार्ज करणार असल्याची धमकी देत असल्याचा आरोप नातेवाकाईकानी केला आहे. दरम्यान, दुय्यम निबंधक अधिकारी जी. आर. पवार म्हणाले की, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची २२ तारखेपासून समस्या सुरू आहे. इंटरनेट नसल्यामुळे एमटीएनएलकडे सकाळी साडेनऊ वाजता तक्रार केली होती. मात्र तिथूनही काम सुरू आहे, असेच सांगितले जाते. शिवाय कार्यालयातही अपुरे कर्मचारी यामुळे विवाह नोंदणीचे कामकाज होऊ शकले नाही. असे त्यांनी सांगितले.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी