पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात 15 पोलिस स्टेशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

नव्यानेच सुरू होणार्‍या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात 15 पोलिस स्टेशन असणार आहेत. पुणे शहरातील 10 तर पुणे ग्रामीण पोलिस दलातील 5 पोलिस ठाण्यांचा त्यामध्ये समोवश आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयात पुणे शहरातील सांगवी, हिंजवडी, वाकड, पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी आणि चिखली ही पोलिस स्टेशन समाविष्ट करण्यात येणार आहेत तर पुणे ग्रामीणच्या हद्दीतील चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगांव दाभाडे आणि तळेगांव एमआयडीसी पोलिस स्टेशन समाविष्ट करण्यात येणार आहेत.

स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात सध्या तरी नवीन कुठलेही पोलिस स्टेशन निर्माण करण्यात येणार नाही. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस स्टेशनची मंजूर पदे, शासकीय इमारत, शासकीय निवासस्थाने, वाहने, शस्त्रे – दारूगोळा व इतर साधनसामुग्रीसह आयुक्‍तालयात समाविष्ट करण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र दवाखाना देखील निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी विद्यकीय अधिकार्‍यांसह 31 पदांची निर्मिती करण्यात येणार असुन पहिल्या टप्प्यात 20 पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात एकुण 70 अकार्यकारी पदे असाणार आहेत.

संबंधित घडामोडी:

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त अप्पर पोलिस महासंचालक दर्जाचे

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयासाठीचे नोटिफिकेशन जारी

पुणे शहर,ग्रामीण मधील 2200 पोलिस अधिकारी,कर्मचारी पिंपरीत