काश्मीरमधील सुमारे १५० फुटीरतावाद्यांना घेतले ताब्यात ; परिसरात तणाव

श्रीनगर : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारने फुटीरतावादी नेत्यांची सराकरी सुरक्षा काढून घेतली आहे. यानंतर आता सरकारने थेट कारवाईलाच सुरुवात केल्याचे दिसत आहे. जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे. यासिन मलिक हा जम्मू- काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख आहे. यानंतर पोलिसांनी मोठ्या संख्येने अटकसूत्र सुरू केले आहे. पोलिसांनी जवळपास डझनभर नेत्यांना ताब्यात घेतले असून सुमारे १५० फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे काश्मीर खोऱ्यात शनिवारी (दि.२३) तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधान कलम 35-A वर सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी काश्मीर खोऱ्यात छापे टाकले. या छाप्यांदरम्यान पोलिसांनी जमात-ए- इस्लामीशी संबंधित सुमारे १५० जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली आहे. याशिवाय यात जमात-ए- इस्लामीचा प्रमुख डॉ. अब्दुल हमीद फैयाज आणि प्रवक्ते ॲड. जहिद अली या दोघांसह डझनभर फुटीरतावादी नेत्यांना अटक केली आहे.

याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, ‘फुटीरतवादी नेत्यांना ताब्यात घेणे हा नियमित प्रक्रियेचा भाग आहे.’ मुख्य म्हणजे जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांना इतक्या मोठ्या संख्येने अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे असेही समजत आहे. याच दरम्यान काश्मीर खोऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेत काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या अतिरिक्त १०० तुकड्या म्हणजे जवळपास सुमारे १० हजार सुरक्षा रक्षक पाठविण्यात आले आहेत. दरम्यान
नेत्यांना अटक करण्याच्या प्रकाराचा जमात-ए- इस्लामीने निषेध केला आहे. आले असल्याचे समजत आहे. सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे. असे असेल तरीही लोकांचे गट एकत्र असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे.