153 देशांच्या 11 हजार वैज्ञानिकांनी केली ‘आणीबाणी’ जाहीर, जगावर ‘या’ संकटाचं ‘सावट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 153 देशांच्या 11 हजार वैज्ञानिकांनी आणीबाणी घोषित करुन जगावर असलेल्या सर्वात मोठ्या धोक्याची चेतावनी दिली आहे. हा धोका पर्यावरणाकडून आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की जर पर्यावरणासाठी तात्काळ काम केले नाही तर अशा समस्येचा सामना कारावा लागेल की कोणीही विचार करु शकत नाही.

वैज्ञानिकांनी ही माहिती बायोसायन्स मॅग्जीनमध्ये प्रकाशित केली. त्याचे म्हणणे आहे की भविष्यात आपल्याला आपली जीवनशैली बदलायला हवी. या अहवाल सांगण्यात आले आहे की वैज्ञानिकांचे हे नैतिक दायित्व आहे की लोकांना संकटाची माहिती देणे. एवढेच नाही तर वैज्ञानिकांनी जलवायू आपातकालची घोषणा करत आपले हस्ताक्षर केले.

वैज्ञानिकांच्या संशोधनाच्या गटाचे नेतृत्व ऑरेगॉन स्टेट यूनिवर्सिटीचे शोधकर्ता विलियम रिपल आणि क्रिस्टोफर वुल्फ यांनी केले, त्यांनी लिहिले की जागतिक जलवायूसंबंधित माहितीला 40 वर्ष पूर्ण झाली असताना देखील आपण आपले काम सुरु ठेवले आहे. या बिकट परिस्थितीला दूर करण्यासाठी अपयशी ठरलो. ते म्हणाले की आता जलवायू संकट आले आहे आणि वाढत आहे.

या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी 6 मोठे पाऊले उचलण्यास सांगितले आहे. ज्यात त्यांनी जीवाश्म इंधनाच्या जागी अक्षय स्रोताचा वापर करावा, मिथेन गॅससारख्या प्रदुषणाच्या उत्सर्जन कमी करणे. भाज्यावर आधारीत जेवणाचा वापर करणे, जनावरांवर आधारीत जेवण कमी करणे, कार्बन मुक्त अर्थव्यवस्था विकसित करणे आणि लोकसंख्या कमी करणे इत्यादीचा समावेश आहे. पृथ्वीवरील तापमान वाढत आहे, मानव नियंत्रणाच्या बाहेर जात आहे.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की मानव जात पृथ्वीवर कायम ठेवण्यासाठी कार्य करावे लागेल. कारण आपले फक्त एकच घर आहे ते म्हणजे पृथ्वी. एक अहवाल समोर आला होता ज्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी ऐतिहासिक पॅरिस करारातून अमेरिका बाहेर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या कराराचा उद्देश कार्बन उत्सर्जन कमी करणे हा आहे.

Visit : Policenama.com