राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर

मुंबई :पोलिसनामा ऑनलाईन

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी उद्यापासून १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी तीन दिवसीय संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला असून उद्यापासून सर्वजण संप पुकारत मंत्रालयाच्या गेटवर निदर्शने देखील करण्यात येणार आहेत.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’10de0385-9962-11e8-9fec-79f142c15247′]

राज्यात होणारी 72 हजार पदांची मेगा भरती मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यात एवढी पदं रिकामी असल्याने कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. तसेच सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी हा संप आहे.

कोण-कोण संपात सहभागी –

संपात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी इ. चा समावेश असेल.

जानेवारीचा मुहूर्त –

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी आता जानेवारीचा मुहूर्त दिला आहे. यापूर्वी दिवाळीचा मुहूर्त दिला होता. अशा प्रकारे सतत सातवा वेतन आयोगा लांबणीवर पडत असल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. शिवाय आता मेगा भरती रद्द केल्याने कर्मचाऱ्यांचा संताप आणखी वाढला आहे.

दरम्यान, राज्य सरकारचे एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी एकदाच संपावर गेल्यास मोठी अडचण होणार आहे. महत्त्वाची सरकारी कामंही ठप्प होण्याची शक्यता आहे.

खालील लिंकच्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/