उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्याने घेतला 19 जणांचा बळी

लखनऊ – वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात विविध भागात वादळी वाऱ्यांने आणि वीज पडल्याने तब्बल 19 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर यात सुमारे 8 लोक गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या मैनपूरी येथे सगळ्यात जास्त म्हणजे 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. एटा आणि कासगंजमध्ये तीन-तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर मुरादाबाद येथे वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या आयुक्त कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.

उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी काल म्हणजे गुरुवारी संध्याकाळी उशीरा वादळी वारे वाहू लागले होते. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उनमळून पडली आहेत तर अनेक घरांच्या भिंती कोसळ्या आहेत. याचा सर्वात जास्त फटका मैनपूरी येथील रहिवाशांना बसला आहे.

आयुक्त कार्यालायातून मिळालेल्या माहितीनुसार मैनपूरी येथील 41 लोक या वादळ अडकून गंभीर जखमी झाले आहेत. बदायू मधील एक व्यक्ती देखील गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्या-त्या मंत्रालायांना आपत्तीजनक परिस्थितीत असलेल्या जिल्ह्यांचा दौरा करण्याची आणि आवश्यक ती मदत पोहचण्याचा आदेश दिला आहे.

सरकारी आकडेवारी नुसार एकूण 19 लोकांच्या मृत्यू झाला आहेत. तर 48 लोक गंभीर जखमी आहेत. या वादळात 8 जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. या वादळाचा फटका तब्बल 12 जिल्हांना बसला आहे. तर 63 जिल्हे सुरक्षित आहेत. तर पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यांने 12 जिल्हात मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना जीव गमवावे लागले तर पिकांचे देखील नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी दिलेल्या आदेशानुसार उपाय योजना राबवण्याचा काम सुरु आहे.