पकडलेले ‘ते’ 2 डंपर, 1 ट्रॅक्‍टर गायब ; प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारातून अवैध वाळूवाहतूक प्रकरणी पकडलेले 2 डंपर, 1 ट्रॅक्टर गायब झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतून महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
राहुरी तहसिलच्या आवारातून वाहने गायब होण्याची ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. राहुरीच्या मुळा नदीपात्रातील वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने कारवाई करून कार्यालयाच्या प्रांगणात ही वाहने ठेवली होती. बुधवारी सकाळी तहसिलच्या आवारातून वाहने गायब झाल्याचे दिसून आल्याने राहुरीचे महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. शासकीय कामानिमित्त तालुक्यातील नागरिकांची तहसिल व पोलीस ठाण्यात ये-जा असल्याने गायब झालेल्या वाहनांची दिवसभर राहुरीत चर्चा होती.
ती वाहने कोणी नेली, याचा मागसूस लागला नव्हता. बुधवारी रात्रीपर्यंत याप्रकरणी पोलिस ठाण्यात कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. तहसील कार्यालयाच्या आवारातच वाळूतस्करांनी वाहने पळवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरीत आहे.

महत्वाच्या बातम्या –

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग, समझोता एक्सप्रेस रद्द 

लोकसभा निवडणूक : माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी रिंगणात ?