आजपासून 1 कोटी पेक्षा अधिक ‘रोख’ रक्कम काढल्यास लागणार 2 % ‘टीडीएस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्षभरात १ कोटी पेक्षा अधिक रक्कम बँक खात्यातून काढल्यास त्यावर २ लाख रुपये टीडीएस बसेल असा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबाजावणी आजपासून (1 सप्टेंबर) होईल. आजपासून बँकेचे व्यवहार, डाक व्यवहार असे मिळून एकूण 1 कोटी किंवा अधिक रक्कम काढण्यात आली तर ग्राहकांना 2 टक्के टीडीएस भरावा लागेल. शुक्रवारी सीबीडीटीने ही माहिती दिली.

अर्थसंकल्पात २ – ५ कोटी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना मात्र मोदी सरकारने धक्का दिला आहे. त्यांच्यावर सरचार्ज लावण्यात आला आहे. तर २ ते ५ कोटी वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांवर कराचा भार वाढला आहे. २ कोटी पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांवर ३% आतिरिक्त कर लावण्यात आला आहे तर ५ कोटी पेक्षा आधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांवर ७ % आतिरिक्त कर लावण्यात आला आहे.

५ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना करातून सूट देण्यात आली आहे, ५ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना आयकर भरण्याची गरज पडणार नाही. बाकी कराच्या स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. 1 सप्टेंबरपासून ग्राहकांना 1 कोटीपेक्षा अधिक रोख रक्कम बँक खात्यातून काढली तर त्यांना 2 टक्के टीडीएस भरावा लागेल. आयकर कायद्यानुसार हा नियम 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात येईल.

1 एप्रिल 2019 पासून होणार रोख रक्कम काढल्याची गणना –
या आधी हा कायदा लागू नव्हता, परंतू एखाद्या व्यक्तीने चालू अर्थिक वर्षात 1 कोटी पेक्षा जास्त रक्कम काढली असेल तर त्याला यावर 2 टक्के टीडीएस लागेल. असे असले तरी 1 कोटी रोख रक्कम काढल्याची गणना 1 एप्रिल 2019 पासून होईल. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 1 कोटी पेक्षा अधिक रोख रक्कम काढल्यास 2 टक्के टीडीएस लावण्याची घोषणा केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –