20 हजार व 2 पावडरच्या डब्यांची लाच घेताना FDA सह आयुक्त अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – नकारात्मक अहवालावरून कोणतीही कारवाई न करण्यासाठी मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाकडून 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना औषधी सह आयुक्तांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.19) सायंकाळी करण्यात आली आहे. चिंतामण कानुजी डांगे (वय-49) असे अटक करण्यात आलेल्या सह आयुक्तांचे नाव आहे. या कारवाईमुळे एफडीएमध्ये खळबळ उडाली आहे. लाचखोर सह आयुक्तावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचे मेडीकल स्टोअर असून तक्रारदाराच्या मेडिकलमधून यापूर्वी घेतलेल्या नमुन्यापैकी काही नमुन्यांच्या नकारात्मक तपासणी अहवालावरून तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी डांगे यांनी 20 हजार रुपये आणि दोन पावडरच्या डब्यांची लाचेची मागणी केली होती. यापूर्वी 18 हजार रुपयाची लाच स्वीकारली होती. उर्वरित दोन हजार रुपयाची लाच व एक पावडरचा डबा स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांनी त्यांच्याच दालनात रंगेहाथ पकडण्यात आले.

चिंतामण डांगे हे अमरावती येथे कार्यरत असून 37 वर्षीय औषध विक्रेत्याने याप्रकरणी तक्रार दिली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, चंद्रशेखर दहेकर, सुनील व हाडे, अभय वाघ, महेंद्र साखरे, चंद्रकांत जनबंधू यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit – policenama.com 

You might also like