Pune News : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी 21 हजार 771 अर्ज दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांतील ७४६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संगणक सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे आज ३० डिसेंबरपर्यंत ऑफलाइन अर्ज दाखल करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती. आज शेवटच्या दिवशी इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यास गर्दी केली होती.

जात पडताळणी प्रमाणपत्र आणि ऑफलाइन अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली. आता इच्छुक उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. आजअखेर एकूण २१ हजार ३५९ उमेदवारांनी २१ हजार ७७१ अर्ज दाखल केले आहेत.

जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. या दिवशी एकूण २१ हजार ७७१ अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.