प्रियकराने नर्सला भेटण्यासाठी बोलावले गेस्ट हाऊसवर अन्…

फरीदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   प्रियकराने तरुणीला गेस्ट हाऊसवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर त्याने खोलीतच तिचा गळा दाबून खून केला. ही घटना हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील वल्लभगड येथे घडली. संबंधित तरुणी एका खासगी नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून नोकरी करत होती.

कविता असे खून झालेल्या 24 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती पलवल येथील पेहरू गावात राहत होती. कविता ही एका खासगी नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून नोकरी करत होती. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता तिची सुट्टी झाली. त्यानंतर पलवलमधील नगलिया गावातील पवन याने तिला फोन केला. सेक्टर 7 मधील एका गेस्ट हाऊसवर भेटण्यासाठी बोलावले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो जेवण आणायचे सांगून तेथून निघून गेला. दोन तास झाल्यानंतरही तो परत आला नाही. त्यानंतर गेस्ट हाऊसमधील कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा आतमध्ये तरुणी मृतावस्थेत आढळली.

दरम्यान, याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबावरून आरोपी पवनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तरुणीच्या गळ्यावर खुणा

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. तरुणीच्या गळ्यावर खुणा असल्याचे पोलिसांना दिसले. तसेच या तरुणीची ओळख पटल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे.