अश्लील व्हिडीओ दाखवून तेरा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत तेरा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून शेजारी राहणाऱ्या तरुणानेच लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला आरडाओऱडा केल्यास मारण्याची धमकी दिली. घाबरून मुलीने हा प्रकार घरी कोणालाच सांगितला नाही. परंतु तिला त्रास होत असल्याने डॉक्टरांकडे गेल्यावर हा प्रकार उघडकिस आला.

पिडीत मुलीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार येरवडा पोलीस ठाण्यात २५ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिडीत मुलगी ही तिच्या आई व आजीसोबत येरवडा परिसरातील तीन मजली इमारतीमध्ये राहण्यास आहे. आरोपी तरुण हा मुळचा कोलकाता येथील राहणारा असून तो पुण्यात ए. सी. रिपेअरींगचे काम करतो. दरम्यान तो त्यांच्या शेजारीच राहण्यास आहे. काही दिवसांपासून तिला पोटात त्रास होत असल्याने तिची आई तिला डॉक्टरांकडे गेला घेऊन गेली. त्यावेळी तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले असल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्यासोबत घडलेला प्रकार तिच्या आईला पिडीत मुलीने सांगितला. पिडीत मुलीची आजी आरोपीला काही काळ जेवणाचा डबा पुरवत होती. त्यामुळे त्याचे घरी येणे जाणे सुरु असायचे. त्यामुळे पिडीत मुलीलाही त्याची ओळख होती. ३ ऑक्टोबर रोजी पिडीत मुलगी रात्री नऊच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत टिव्ही पाहात होती. त्यावेळी आरोपी तरुण तेथे आला. त्याने तिचा हात पकडला. त्यानंतर सात आठ दिवसांनी पुन्हा घरी आला. तिला तुझे सेक्स के बारे में पता है क्या मै तुझे बताऊं क्या असे म्हणत मोबाईलमधील अश्लील फोटो दाखवू लागला. त्यानंतर पिडीत मुलीने मला फोटो दाखवू नको असं म्हणत त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी तो तिला येऊन मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ दाखवू लागला. त्यामुळे ती खालच्या खोलीत निघून गेली. तो पुन्हा १५ डिसेंबर रोजी घरी आला. शनिवार असल्याने ती घरात झोपलेली होती. त्यावेळी आरोपी तरुणाने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिचे तोंड दाबून आरडाओरडा केला तर तुला मारेन अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार समोर आल्यानंतर मात्र तो आरोपी तरुण पसार झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचा शोध सुरु आहे. असेही त्यांनी सांगितले. महिला पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.