चिंताजनक ! पुण्यात ब्लॅक फंगसची 270 प्रकरणे, उपचारासाठी मार्गदर्शक तत्वे ठरली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात ब्लॅक फंगसची सुमारे 270 प्रकरणे समोर आल्यानंतर सरकारच्या एका कार्यकारी दलाने हॉस्पिटल्समध्ये रूग्णांवर उपचारासाठी मानक संचालन प्रक्रिया तयार केली आहे. अधिकार्‍यांनी शुक्रवारी याबाबत सांगितले.

आरोग्य तज्ज्ञांनुसार, सायनसच्या समस्येने नाक बंद होणे, अर्धा चेहरा बधीर पडणे, डोळ्यांमध्ये सूज, अस्पष्ट दिसणे, छातीत वेदना होणे, श्वास घेण्यास त्रास आणि ताप येणे, ही ब्लॅक फंगस संसर्गाची लक्षणे आहेत.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या विविध हॉस्पिटलमध्ये अशाप्रकारच्या संसर्गाची आतापर्यंत सुमारे 270 प्रकरणे समोर आली आहेत. आमच्या विभागीय पथकाचे सदस्य डॉ. भरत पुरंदरे यांनी ब्लॅक फंगसच्या व्यवस्थापनासाठी सविस्तर मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) तयार केली आहे.

मार्गदर्शक तत्वांचे पालन करा
राव यांनी सांगितले की, राज्यात सर्व हॉस्पिटलसाठी मानक संचालन प्रकिया जारी केली आहे. आम्ही सव हॉस्पिटल्सना एसओपीमध्ये ठरलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.

पुणे जिल्ह्यात ब्लॅक फंगसच्या मृत्युदराबाबत विचारले असता सांगण्यात आले की, याबाबत आकडे जमवले जात आहेत. नोबेल हॉस्पिटलचे डॉ. अभिषेक घोष यांनी म्हटले, कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेत याची जास्त प्रकरणे समोर येत आहेत.